परिचय

About images

डॉ. शाळिग्राम भंडारी : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व


' उत्कट, अदम्य, अदभूत, चैतन्याने नटलेले , उत्साही- आनंदी आणि सर्वदूर सकारत्मक दृष्टीने पाहणारे'
डॉ.शाळिग्राम भंडारी एक गुणसंपन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्व ! अंगिकारलेल्या कार्यासाठी , अपार कष्टासह सुनियोजितपणे जिद्दीने. समर्पितपणे कार्यरत होणे , हा त्यांचा स्थायीभावच !
खर तर , डॉ.शाळिग्राम भंडारी वैद्यकीय क्षेत्रातील १९७४ पासून तळेगाव दाभाडे व ग्रामीण परिसरातही ' रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' या श्रदेने ते कार्यरत झाले ;त्यामुळेच त्यांनी संपूर्ण मावळ परिसरात लौकिक प्राप्त केला.
आपल्या ' भंडारी हॉस्पिटल' च्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाच, त्यांच्यातील समाजसेवक मनस्वि ध्यासासह अनेकानेक प्रकल्प, संस्था , मंडळे यांच्या माध्यमातून कार्य करू लागला. डोळयांची , आरोग्याची शिबिरे ,व्यसनमुक्ती प्रसार, पाणी आडवा -पाणी जीरवा चळवळ, गोर -गरीब व्यक्ती- संस्थाना मदत इत्यादी क्षेत्रात त्यांचे कार्य गौरवास्पद आहे.
' पाचाने' येथील ' शांताबाई येवले' यांनी ' आभाळमाया' नामक वसतिगृहाची स्थापना करून गोर -गरीब, अनाथ
मुलींचे पालन- पोषण करता करता, त्यांना शिक्षण देऊन समर्थ करणे, या संस्थेला सुरुवातीपासून भक्कम आर्थिक मदत व सहकार्य डॉ.भंडारी यांचे लाभले आहे.

अधिक माहिती..

पुस्तके

भाग्य आले तदनंतरे..

डॉक्टर भंडारी यांचे आत्मचरित्र - कविवर्य
विंदा करंदीकर यांच्या नावाने दिलेे जाणारे महाराष्ट्र शासनाचे रुपये 51 हजाराचे
चे प्रथम पारितोषिक २०१७ साली
सन्मानपूर्वक प्राप्त झालेले आहे.

शिदोरी

चारित्र्य, कर्तृत्व, व्यक्तिमत्व,
नेतृत्व, निष्ठा, प्रेरणा, इत्यादी असंख्य
प्रेरनादायी विषयांवर केलेले
मौलिक चिंतन.

जगताना-जगवतांना !

आजवर या पुस्तकाच्या सहा
आवृत्या प्रकाशित. मानवी स्वभावाची
वैशिष्ट्ये, हृदयस्पर्शी घटनांनी
सजलेले प्रेरक पुस्तक.

अंधारातून प्रकाशाकडे

सुख -दुःख, यश -अपयश, पाप-पुण्य
यांसारख्र्या असंख्य संदर्भात अनेक
उदाहरणातून, दृष्टांतातून, संत
वचनांतून केलेले प्रेरक लेखन .

अभिप्राय

डॉ. के. एच. संचेती

“डॉ. शाळीग्राम भंडारी हा माझा विद्यार्थी. उत्साहाचं रक्त त्याच्या अंगात असावं. खान्देशकडाचा हा मुलगा बी. जे. मेडिकलला शिकत असताना 'इंटरशिप' साठी माझ्याकडे यायचा, मन लावून शिकायचा, अनेक प्रश्न विचारायचा, त्याच्यातली हि चिकित्सक वृत्ती मला आवडली. रुग्णांशी संवाद साधताना बोलण्यातलं आर्जव आणि अगत्य जाणवलं. त्याची सतत कार्यमग्न राहण्याची आणि अनेक मैत्रबंध जोडून जोपासण्याची वृत्ती मला भावली. तो रसिक आहे. कलावंत आहे. संपन्न व्यक्तिमत्वाचा प्रत्येक बुरुज तो काळजीपूर्वक बांधतो आहे. शब्दांचा साधक आहे. नम्र आहे. सौजनशील आहे. त्याला गुरुविषयी आदर आहे. एक डॉक्टर, रुग्णसेवक, लेखक व माणूस म्हणून कार्यरत आहे. मुख्य म्हणजे त्याच्या आयुष्याच्या यात्रेत जे जे भेटले आणि ज्यांनी प्रसंगी त्याला आधारहि दिला त्यांना तो अजिबात विसरला नाही, हे येथे नमूद करताना मला अतिशय आनंद होतो आहे. योग्य उपचार करून हॉस्पिटल मध्ये आलेल्या रुग्णांना बरे करणे हा जसा त्यांचा ध्यास, तसे आपल्या लेखनातून - वक्तृत्वातून संस्काररूपी टॉनिक रसिक वाचक-श्रोत्यांना देणे, हा देखील त्यांचा ध्यासच झाला आहे.” — पदमविभूषण डॉ. के. एच. संचेती
अस्थिरोग तज्ञ, संचेती हॉस्पिटल, पुणे .

यजुर्वेंद्र महाजन

“अदम्य, उत्कृष्ट, अदभूत चैतन्य म्हणजे आदरणीय डॉ. भंडारी. आनंद, उत्सव, सकारात्मकता या बाबी वयावर अवलंबून नसतात तर आपल्या वृत्ती व दृष्टिकोनावर अवलंबून असतात. याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. शाळीग्राम भंडारी. त्यांचा प्रवास, त्यांची व्याख्याने, त्यांचे लेखन, सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग हे सर्व अचंबित करणारे आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेल्या डॉ. भंडारी यांनी आयुष्यात जे अनुभव घेतले, पाहिलेत, चढउतार बघितलेत त्यातून त्यांना जो जीवनात अर्थ समजला तो त्यांना वाटून द्यायला आवडतो.
जे जे आपणास ठावे, ते ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन |” — प्रा. यजुर्वेंद्र महाजन
संस्थापक, दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव .

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे

माझे आदरणीय प्रिय मित्र डॉ. शाळीग्राम भंडारी हे माझ्याच आयुष्याच्या वाटेवरचे एक स्नेहाचे वृंदावन आहे. मनाने प्रसन्न, वृत्तीने दिलदार आणि ज्ञानाने प्रगल्भ असे एक धन्वंतरी म्हणून मला डॉ. भंडारी यांच्याबद्दल आदर वाटतो. मनुष्य जीवनाची सार्थकता हि त्याने जपलेल्या जीवनमूल्यांवर अवलंबून असते. डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्यासारखा उमदा माणूस माणसांच्याच व्यक्तिमत्वाचे असे सुंदर दागिने घडविण्याचे प्रयत्न करतात. खरं तर संस्काराने प्राप्त झालेली सुंदरता ही व्यक्तिमत्वाची श्रीमंती असते, त्या दृष्टीने डॉ. भंडारी हे कुबेर आहेत. — प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
सातारा कॉलेज .

डॉ उल्हास लुकतुके

“ तळेगाव दाभाडे येथे गेली ३० वर्षे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. यशस्वी डॉक्टर, समाजसेवक, संस्थाचालक, लायन्स क्लबचे अध्यक्ष, पर्यटक, लेखक, निरीक्षक, समाजाचे हितचिंतक, कुटुंबप्रमुख, प्रेमळ पती व पिता अश्या अनेकएक खासियत आहेत. प्रत्येक प्रसंगी त्यांची निरीक्षणशक्ती आणि विचारशीलता जागी असते. डॉ. शाळीग्राम भंडारी यांनी आपल्या लेखनात काव्यपंक्ती, उर्दू शेर, संस्कृत सुभाषिते, संतवचने यांचा उत्तम आणि भरपूर वापर केला आहे. शैली सहज सोपी आणि भाषा जवळ जवळ बोलीभाषा आहे. त्यामुळे पुस्तक वाचण्यास छान आणि विषय समजण्यास सोपा जातो.” — डॉ उल्हास लुकतुके
मनोविकारतज्ञ, पुणे .

यशराज कुलगुडे

सरांनी भाषण देताना अचानक हातात ग्लास घेतला. मला आश्चर्य वाटले. त्या ग्लासचे सर काय करतील? तेव्हा सरांनी सांगितले समजा हा ग्लास ५० रुपयांचा आहे त्यात आपण दूध भरले तर त्याची किंमत ६० होईल. जर त्यात सुका मेवा भरला तर त्याची किंमत १५० रुपये होईल. ह्या ग्लास प्रमाणे आपण आहोत. जेवढे ज्ञान वाढेल तेवढी किंमत वाढत जाईल. त्यांनी आम्हाला आयुष्याची वाट दाखवली. ते माझे आदर्श आहेत. त्यांचे विचार हे माझे "Life Changer" आहेत. — यशराज कुलगुडे
(कोल्हापूर) .

सार्थ पाटील

“ भंडारी सरांनी त्यांच्या भाषणातून आम्हाला प्रेरित केले. त्याचे भाषण हे खूप चांगले व प्रेरणादायी होते. ते एक चांगले डॉक्टर आहेत, एक चांगले वक्ता आहेत आणि एक चांगले लेखक ही आहेत. त्यांनी १० पुस्तके लिहली आहेत. त्या पुस्तकामध्ये जगायचे कसे, चांगले वागायचे कसे व ताण कसा कमी करायचा हे सांगितले आहे. त्यांचा जीवनातील घडलेले सत्य गोष्टी / किस्से आम्हाला सांगितले. त्यांनी आपल्या भाषणातून आम्हाला फक्त प्रेरितच केले असे नाही तर आम्हाला खूप हसवले व आनंदी केले. आम्हाला त्यांचा स्वभाव खूप आवडला व ते खूप प्रेमळ व आनंदी आहेत.” — सार्थ पाटील
(औरंगाबाद) .