परिचय

डॉ. शाळिग्राम भंडारी : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व


' उत्कट, अदम्य, अदभूत, चैतन्याने नटलेले , उत्साही- आनंदी आणि सर्वदूर सकारत्मक दृष्टीने पाहणारे'
डॉ.शाळिग्राम भंडारी एक गुणसंपन्न प्रेरणादायी व्यक्तिमत्व !
अंगिकारलेल्या कार्यासाठी , अपार कष्टासह सुनियोजितपणे जिद्दीने. समर्पितपणे कार्यरत होणे , हा त्यांचा स्थायीभावच !
खर तर , डॉ. शाळिग्राम भंडारी वैद्यकीय क्षेत्रातील १९७४ पासून तळेगाव दाभाडे व ग्रामीण परिसरातही ' रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा' या श्रदेने ते कार्यरत झाले ; त्यामुळेच त्यांनी संपूर्ण मावळ परिसरात लौकिक प्राप्त केला.
आपल्या ' भंडारी हॉस्पिटल' च्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाच, त्यांच्यातील समाजसेवक मनस्वि ध्यासासह अनेकानेक प्रकल्प, संस्था , मंडळे यांच्या माध्यमातून कार्य करू लागला. डोळयांची , आरोग्याची शिबिरे ,व्यसनमुक्ती प्रसार, पाणी आडवा -पाणी जीरवा चळवळ, गोर -गरीब व्यक्ती- संस्थाना मदत इत्यादी क्षेत्रात त्यांचे कार्य गौरवास्पद आहे.
' पाचाने' येथील ' शांताबाई येवले' यांनी ' आभाळमाया' नामक वसतिगृहाची स्थापना करून गोर -गरीब, अनाथ

मुलींचे पालन- पोषण करता करता, त्यांना शिक्षण देऊन समर्थ करणे, या संस्थेला सुरुवातीपासून भक्कम आर्थिक मदत व सहकार्य डॉ.भंडारी यांचे लाभले आहे.
याशिवाय असंख्य गरीब होतकरू मुला-मुलींना वेळोवेळी आर्थिक मदत देत आहेत. अगदी पर् वा मावळातील अशोक घारे यांच्या अकाली मृत्यूने निराधार झालेल्या त्या कुंटुंबाला स्वतः मदत केलीच शिवाय मदतीसाठी अनेक संस्थाना त्यांनी प्रोत्साहित केले.
लायन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी केलेली कार्येही गौरवास्पद आहेत. भंडारी हॉस्पिटल बस स्टॉप, जेष्ठ नागरिक संघाचा दादा-दादी पार्क आहे, तसेच तळेगाव येथे लायन्स क्लब खुले नाट्यगृह केले आहे. दादा-दादी पार्क येथे विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करता करता त्यातूनच छोट्या छोट्या प्रसंगावर बोलता बोलता व लिहिता लिहिता त्यातूनच त्यांच्यातील प्रभावी वक्त्यांचे व सवेंदनशील लेखकाचेही दर्शन होऊ लागले. आज प्रभावी वक्ता म्हणून त्यांचे नाव ' मावळच्या' सीमा ओलांडून महाराष्ट्रभर झाले आहे.
त्याच बरोबर विविध विषयांवर परिणामकारक लेखन करता करता त्यांची * इंद्रधनूच्या क्षितिजावरती * आपणच आपल्या मनाचे डॉक्टर *अनुभूती * आठवणींच्या किनाऱ्यावरती * मला भेटलेले रुग्ण *व्यक्तिमत्व विकास - पाऊलखुणा* शिदोरी *अंधारातून प्रकाशाकडे *प्रारब्ध *यांना जीवन कळले हो! इ. पुस्तके प्रकशित झाली आहेत. त्यांच्या आजवरच्या चौफेर जीवन वाटचालीचा वेध घेणारे प्रसिध्द लेखक सुमेध वडावाला लिखित ' भाग्य झाले तद्नंतरे' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ज्याला विं. दा. करंदीकर पुरस्कार स्वरूप रु. ५१००० /-चे पारितोषिक मिळाले आहे.
- विशेष म्हणजे, मुंबई दूरदर्शन वरून त्यांचे विविध विषयावरील कार्यक्रम होतच आहेत .
- डॉ. भंडारी यांच्या चौफेर कार्यकर्तृत्वाबद्दल असंख्य मान्यवर संस्था , मंडळे यांनी त्यांचा गौरव केला आहे.
कित्येक पुरस्कार दिले आहेत. लायन्स क्लब, माहेश्वरी समाज, स्पोर्ट्स अकॅडमी, दीपस्तंभ, इ. संस्थाचा उल्लेख करावा लागेल .
-आपल्या हॉस्पिटल मध्ये आलेल्या रुग्णावर योग्य उपचार करून बरा करणे हा जसा डॉ. भंडारीना ध्यास आहे त्याच ध्यासाने आपल्या व्याख्यानाच्या व लेखनाच्या माध्यमातून मनामनामध्ये ' संस्करदायी प्रेरणेचा' प्रयत्न करीत असतात.
- एक प्रथितयश डॉक्टर, मनस्वी रुग्णसेवक, प्रभावी वक्ता, समर्थ लेखक आणि समर्पित समाजसेवक म्हणून डॉ. शाळिग्राम भंडारी यांची प्रेरणादायी-चैतन्यदायी वाटचाल नवनव्या ध्यासांनी बहरते आहे.
- ह्याच माध्यमातून महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यात आता पर्यंत व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक निष्ठा, स्त्री-जीवन, स्थित्यंतर, आपले आरोग्य आपले हाती, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आणि एकत्र कुटुंब पध्दती, सामाजिक गरज, अशा विविध विषयांवर जवळ-जवळ २५०० व्याख्याने विद्यालये, महाविद्यालये, च्या माध्यमातून अल्पशा मानधनातून देत असतात. किंबहुना विविध सामाजिक संस्थांना विनामूल्य प्रबोधन व मार्गदर्शन करत असतात. दातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व ह्या तीनही सदगुणांचा समावेश प्रत्येक व्यक्तिमत्वात असावा ह्यासाठी डॉ. भंडारी ह्यांचे हे अभियान अविरत सुरु आहे आणि सुरु राहणार आहे.
डॉक्टर भंडारी यांची आत्तापर्यंत 3000 व्याख्याने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण अशा संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने गेली 30 वर्षे सुरू आहेत. व्यक्तिमत्व विकास, एकत्र कुटुंब पद्धती, व्यवसायिक निष्ठा, आनंदी जीवन, आणि आपले आरोग्य आपल्या हाती... अशा अनेक विषयांवर ते कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देतात.