पुस्तके

भाग्य आले तदनंतरे..

डॉक्टर भंडारी यांचे आत्मचरित्र - कविवर्य
विंदा करंदीकर यांच्या नावाने दिलेे जाणारे महाराष्ट्र शासनाचे रुपये 51 हजाराचे
चे प्रथम पारितोषिक २०१७ साली
सन्मानपूर्वक प्राप्त झालेले आहे.

शिदोरी

चारित्र्य, कर्तृत्व, व्यक्तिमत्व, नेतृत्व, निष्ठा, प्रेरणा, इत्यादी असंख्य प्रेरनादायी
विषयांवर केलेले मौलिक चिंतन.

जगताना-जगवतांना !

आजवर या पुस्तकाच्या सहा आवृत्या
प्रकाशित. मानवी स्वभावाची वैशिष्ट्ये, हृदयस्पर्शी घटनांनी सजलेले
प्रेरक पुस्तक.

अंधारातून प्रकाशाकडे

सुख -दुःख, यश -अपयश, पाप-पुण्य यांसारख्र्या असंख्य संदर्भात अनेक उदाहरणातून, दृष्टांतातून , संत
वचनांतून केलेले प्रेरक लेखन .

जीवन यांना कळले हो!

समाजातील दीन-दुबळ्या, उपेक्षित अपंग, निराधार , वृद्ध इत्यादींसह समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी अंगिकारलेल्या
क्षेत्रात समर्पितपणे वाटचाल करीत
असलेल्या मान्यवर व्यक्तिमत्वांचा व
त्यांच्या कार्याचा प्रेरनादायी परिचय.

अनुभूती

आई-वडील, गुरूजन यांसारख्या
जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या संस्कारीत करणाऱ्या अनेकानेकांचा परिचय व
त्या अनुरोधाने अनेक घटकांचे अभ्यासपूर्ण भाष्य .

आठवणीच्या किनाऱ्यावर

जीवन वाटचालीत घडलेल्या अनेक व्यक्तिमत्वांचे दर्शन,
त्यांचे हृदयस्पर्शी चित्रण.

व्यक्तिमत्व विकास

व्यक्तिमत्व परिभाषा, व्यक्तिमत्वाचे पैलू, व्यक्तिमत्व प्रभावी करणारे घटक, काही व्यक्तिमत्व संपन्न व्यक्ती इत्यादी
संदर्भातील सोदाहरण लेखन.

शेरो - शायरी

सूत्रसंचालन , लहान -मोठया सभा
_समारंभातून सादर होतांना उपयॊगी
पडतील अशा शेरो-शायरी, काव्यपंगती,
वचने यांचे सुरेख संकलन श्री . राधेश्याम
भंडारी यांनी या पुस्तकांद्वारे सादर केले आहे.

प्रारब्ध

अनेकांच्या जीवनात घडणारे अघटित
प्रसंग 'प्रारब्धच' म्हणावे अशा सुख
-दुःखांदायी घटना अनेकांच्या जीवनात
घडलेले प्रसंग या माध्यमातून विवेचन .

राखिली बहुतांचीं अंतरे

हॉस्पिटलमध्ये इतरत्र रुग्णसेवा करीत
असतांना आलेले विविधांगी अनुभव
व अदृश्य शक्तींच्या प्रचितीचे दर्शन.

रे मना !..

वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना शरीराचे
ज्ञान अवगत होते. मात्र मनाचा ठाव
लागत नाही याच मनाच्या संदर्भात मनाला
स्पर्श करणाऱ्या घटना-प्रसंग-कथा यांचे ओघवत्या शब्दातून दर्शन.

आपणच आपल्या मनाचे
डॉक्टर

हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रूग्णांच्या
शारीरिक, मानसिक व्यथा-वेदना, त्या
दृष्टीने संवाद व उपचार 'आपणच आपल्या
मनाचे डॉक्टर' संदर्भात मार्गदर्शन व
त्यातून आलेली प्रचिती.